सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : राणे यांची प्रतिष्ठा पणाला, 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Updated: Dec 30, 2021, 09:56 AM IST
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : राणे यांची प्रतिष्ठा पणाला, 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात title=
संग्रहित छाया

सिंधुदुर्ग : Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस आहे. राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक :  मोठी चुरस 

जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असून तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्र असतील. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्र आहे. आमदार वैभव नाईक आणि राजन तेली 8 वाजता मतदानाचा हक्क बजावला.  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक या आधी नारायण राणे यांची सत्ता होती. 2008 पासून बँक राणे यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, 2017मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून फारकत घेत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँके शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली.

या आधी एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या. सध्या महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत होत आहे.

एकूण 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आणि विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे. एकूण 981 मतदार मतदान करणार आहेत.