पुणे : Pune murder : कौटुंबिक वादाच्या (family dispute) कारणातून जावयाने सासर्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून (Son-in-law murder his father-in-law ) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर जावयाने हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबूली दिली.
अशोक गुलाब कुडले (38,रा. खडकी बाजार) याने सासरे रमेश रामचंद्र उत्तरकर (65, रा. आकाशदीप सोसायटी खडकी) यांचा चाकूने खून केला. खुनानंतर पोलिसांनी अशोक गुलाब कुडले याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडले हा उतरकर यांचा जावई आहे. 2019 पासून कुडले आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून पती-पत्नी वेगळे राहत आहेत.
कुडले त्याच्या आईसोबत, तर त्याची पत्नी वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तर उत्तरकर यांची दोन दुकाने असून त्यांनी दोन्ही दुकाने भाड्याने दिली आहेत. तर कुडले हा वडापावची गाडी चालवतो. दरम्यान, त्यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ठ आहे. कुडले हा उत्तरकर यांना पत्नीला नांदायला पाठवा, असे सातत्याने सांगत होता. तर उत्तरकर हे घटस्फोट घेण्याबाबत आग्रही होते. याच प्रकरणाबाबत बुधवारी न्यायलयात तारीख होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले आणि उत्तरकर यांच्यात वाद झाला.दरम्यान, उत्तरकर सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यामध्ये उत्तरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुडले चाकू हातात घेऊन स्वतः खडकी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने या घटनेची खडकी पोलिसांना दिली.