SSC Exam Paper Viral : दहावीचा पेपर सोशल मीडियात व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये हा प्रकार घडलाय. माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने येऊन यावर योग्य ती कार्यवाही केली आहे. या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावरुन पेपर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे. येथे बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहाव्या वर्गाच्या मराठी विषयाचा पेपर सुरु होता. परीक्षा सुरु झाल्यापासून अवघ्या 10 मिनिटातच व्हायरल झाला. याबाबत माहिती मिळाल्यावर भरारी पथकाने केंद्र गाठून उपस्थितांची जबानी घेतली.
त्यानंतर पांढरकवडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी. यादृष्टीने विविध पथके गठीत करण्यात आली. हा पेपर अवघ्या दहा मिनिटांत सोशल मिडीयावर व्हायरल झाला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ऐनवेळी नवीन अभ्यासण्याचा प्रयत्न करु नका. वर्षभर जो अभ्यास केलाय त्याची उजळणी करा.
मन शांत ठेवा. जास्त ताण घेऊ नका. तुम्ही देत असलेली परीक्षा वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित असेल.
परीक्षा केंद्रावर कोणी मदत करेल, पर्यवेक्षक आपल्या दृष्टीने चांगला असेल,अशा भ्रामक कल्पनेत राहू नका. स्वत:च्या अभ्यासावर विश्वास ठेवा.
कॉपी करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका. छोटीशी चूक तुमच्या करिअरवर परिणाम करु शकते.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचा.
परीक्षेला जाण्यापुर्वी हॉलतिकीट आणि ओळखपत्र घेतले आहे की नाही? हे तपासा.
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. नसेल तर तुम्हाला परीक्षेसाठी अडचण येऊ शकते.
विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, ब्लूटूथ, इयर फोन असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेऊ नका.
प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो हे लक्षात ठेवा. त्यानुसार संपूर्ण पेपर आणि वेळेचे नियोजन करा.
उत्तरपत्रिका लिहायला घेण्याआधी बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र क्रमांक सर्व बरोबर टाका. पेपर देण्यापुर्वी तपासून पाहा.
प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करा..खाडाखोड करणे टाळा.
प्रश्न बारकाईने आणि दोनवेळा वाचा. आपण अभ्यास केलेला प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्यामुळे गोंधळून जाऊ नका.
निकाल काय लागेल, हे तुमच्या हातात नाही. पण परीक्षा चांगली देणे हे नक्कीच आहे.
परीक्षेवेळी कोणताही त्रास जाणवत असेल तर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या.
बारावीची परीक्षा आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. त्यामुळे मानसिक ताण घेणे टाळा आणि शांत, एकाग्र मनाने परीक्षा द्या.