तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री?

Baramati CM Eknath Shinde: नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 2, 2024, 01:54 PM IST
तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री? title=
Baramati Eknath Shinde

Baramati CM Eknath Shinde: तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, बारामतीला नंबर एक करु असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे बारामती येथे बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केले तर बारामतीकरांना आश्वासन दिले. 

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बारामतीकरांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. या नमो रोजगार मेळाव्यात बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. बारामती विकासाचे मॉडेल आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना त्याचे श्रेय आहे. आमचं सरकार विकासाभिमुख आहे, लोकांचे आहे. याठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. आम्ही चांगल्या कामात राजकारण आणत नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

राज्यात सरकारी नोकरभरती होत आहे. पोलीस खात्यात भरती सुरू आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या लाभ देखील या निक्रभरित्मध्ये उमेदवारांना मिळणार आहे. लोकांना सभागृहात बोलवून नियुक्ती पत्र देणारे हे पहिलेच सरकार असेल, असे ते म्हणाले. 

बारामती एक नंबर करणार असं अजित पवार म्हणाले. त्यांना सहकार्य करण्यात आम्ही हात आखडता घेणार नाही. तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच हातात आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

काय म्हणाले फडणवीस?

'गेल्या दोन तीन दिवसांत माध्यमे आणि त्यांच्या प्रतिनिधींना काम मिळाले आहे. त्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली. अशा कामात राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतो त्याचे उदाहरण इथे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात 55 हजार पदे आहेत. यासाठी अर्ज कमी आणि पदे जास्त आहेत. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार मिळणार आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी केलेल्या कामासाठी अजित पवार यांचे कौतुक केले.

"आम्ही राजकारणी कंत्राटी रोजगार आहोत. आम्हाला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळते. चांगलं काम केलं तर पुन्हा संधी मिळते नाहीतर घरी बसावे लागते. अजित पवारांनी इतक्या उत्तम इमारती केल्या की त्याचे पीएमसी त्यांना द्यावे असं मला वाटते. पण ते म्हणतील खातेच मला द्या. पण तसे होणार नाही, खाते माझ्याकडेच ठेवणार," अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी केली.