दिवाकर रावतेंच्या आदेशानंतर संजय राऊत यांचं निलंबन

देवगड बोरिवली एसटी बसचा चालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार झी २४ तासने समोर आणला होता. 

Updated: Sep 9, 2018, 08:23 PM IST
दिवाकर रावतेंच्या आदेशानंतर संजय राऊत यांचं निलंबन title=

रत्नागिरी : देवगड बोरिवली एसटी बसचा चालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार झी २४ तासने समोर आणला होता. प्रवाश्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार चालकाच्या कृत्याची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कडक कारवाईचे आदेश विभागीय नियंत्रकांना दिले होते. त्यानंतर संजय राऊत या चालकाचे तीन महिन्यांसाठी एसटी सेवेतून निलंबन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाकडून बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करणाऱ्या चालकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. यामध्ये आर्थिक दंड, पगारवाढ स्थगिती तसेच निलंबनाच्या कारवाईचा समावेश असतो. मात्र इतर चालकांना देखील शिस्तीचा धाक बसावा यासाठी पहिल्यांदाच या चालकावर फक्त मोबाईलवर बोलल्यामुळे निलंबनासारखी मोठी आणि कडक कारवाई केली गेली आहे.

पाहा काय म्हणाले होते दिवाकर रावते