शिंदे - फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

Updated: Aug 14, 2022, 05:20 PM IST
शिंदे - फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती title=

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर तब्बल 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे लवकरच खातेवाटप होईल असे सांगण्यात आलं होतं. मात्र खातेवाटप लगेचच जाहीर केले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी खातेवाटप झालेले नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

पाहा कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

 विजयकुमार गावित - आदिवासी विकास

गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 

 दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 

संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे - कामगार

 संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 उदय सामंत- उद्योग

तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार - कृषी

दीपक केसरकर - शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास