रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : कोरोनाचे संकट राज्यावर असताना दुसरीकडे राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार करत असलेली मदत पुरेशी नसल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती. याला सरकारमधील मंत्री उत्तर देताना दिसत आहेत. जो शिशोंके घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते असा टोला राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी लगावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.
महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली ही सर्वांना माहीत आहे. चंद्रकांतदादां सारख्या जेष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण करू नये अशी टीका ही राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
कोरोना बाधित जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केल्याचे वृत्त कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फेटाळले. सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केलेत ही खोटी बातमी आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने असे कोणतेही झोन घोषित केले नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण दिले.
१४ तारखेनंतर ही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार अथवा शासनाकडून केले नाहीत, अस ही कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे.