कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.

Updated: Aug 14, 2018, 01:44 PM IST
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू title=

नंदुरबार:  नवापूर तालुक्यात धनराट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतल्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. पाचवीत शिकणारा अनिकेत नाईक हा विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. तो भांगरपाडा येथील रहिवासी आहे. रविवारी संध्‍याकाळी अनिकेतवर कुत्र्यांनी हल्‍ला केला होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, आश्रमशाळेमागचं उष्ट अन्न खायला रविवारी संध्याकाळी कुत्री जमली होती. त्याचवेळी तिथे शौचासाठी गेलेल्या अनिकेतवर कुत्र्यांनी हल्ला केला. अनिकेत या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या हाताच्या नसा फाटल्या होत्या. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण उपचारांदरम्यान सोमवारी संध्य़ाकाळी त्याचा मृत्य झाला.

नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.