HSC Board Exams JALNA : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams ). परिक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठा घोळ पहायला मिळाला (HSC Board Exams). बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक झाली. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले ( Error in English Subject Question Paper). प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तर, आजा दुसऱ्या पेपरला वेगळाच गोंधळ पहायला मिळाला.कॉपीमुक्त परीक्षेचा विद्यार्थ्यांनी धसका घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. हिंदी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जालना (JALNA) येथील परीक्षा केंद्रावर शुकशुकाट पहायला मिळाला.फोन करून बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत.
राज्यभरात यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेय.
कॉपी मुक्त अभियानाचे भरारी पथक परीक्षा केंद्रांवर धाड सत्र राबवत आहे. परिक्षेच्या पाहिल्या दिवशी जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कॉपी करताना 16 विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल आहे.
जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागलं. आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला.
एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं.
यंदाच्या वर्षी परीक्षांदरम्यान बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात येणारी झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.तसेच मोबाईल वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
बारावी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. इंग्रजी पेपरच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण, नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल अशी माहिती समोर आली आहे. बोर्डाकडून खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केले आहे. या प्रश्नाचे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 6 मार्क दिले जाऊ शकतात.