Success Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!

Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत. 

Updated: Dec 3, 2022, 03:34 PM IST
Success Story:  प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य! title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत. परंतु आज अशा अनेक अंध व्यक्ती आहेत ज्या स्वत:च्या पायावर उभं राहतं आज आपलं असं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. शून्यातून सुरूवात करत या व्यक्ती आज जगावर राज्य करत आहेत. त्यातीलच अशीच एक व्यक्ती म्हणजे रवींद्र ताकसांडे. त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या संघर्षातून उभं राहत आज स्वत:च असं हक्काचं (success story of ravindra taksande) जग निर्माण केलं आहे.   

दिव्यांग म्हटलं दिवंगत्वाचा बाऊ करून अनेकजण बाऊ करत स्वतःचं आयुष्य मर्यादित करून घेतात. पण काहीजण त्या पलीकडे जाऊन आपला आयुष्यला दिशा देतात तसेच इतरांसाठी सुद्धा आधार प्रेरणादायी (inspirational) होतात. नागपुरातील असेच रवींद्र ताकसांडे (nagpur news) यांनी स्वतःसाठी केनच्या खुर्च्या विणून रोजगार निर्माण केलाच. त्याच सोबत त्यांनी इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. मागील 22 वर्षांपासून विधान भवनात अधिवेशन काळात केनच्या खुर्च्या विणण्याचं (stiching) काम ते घेतात. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकांना कलेचे प्रशिक्षण (training) देत रोजगार उपलब्ध करून दिला. जागतिक दिव्यांग दिनी जाणून घेऊन त्यांचा संघर्षमय प्रवास.

कसा आहे त्यांचा प्रवास? 

राष्ट्रीय अंध आणि जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रवींद्र ताकसांडे हे 22 वर्षांपासून कालबाह्य होत असलेल्या मात्र सरकारी कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या केनच्या खुर्च्या विणण्याचे (cane furniture) काम करत असतात. आजकाल खुर्च्या विणण्याच काम अनेकांना जमत नाही. पण काही जुन्या कारागिरांना घेऊन हे काम आजही करतात. त्यातून ते इतरांना रोजगार उपलब्ध (employment) करून देतात. तसेच त्यांच्या संस्थेचे बुट्टीबोरीला विनाअनुदानित वसतिगृह आहे. ज्यामध्ये दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर उभं होता याव यासाठी व्यवसायिक प्रशिक्षण (professional trainning) त्यांना उपलब्ध करून देतात. ज यासह इतर परीक्षांसाठी मुलांना राहण्याची खाण्याची सोय केली जाते. यात काहींनी बँकांमध्ये तर काही सरकारी यंत्रणेत नौकरी लागल्याचेही रवींद्र ताकसांडे  सांगतात.

शून्यातून यशाकडे...

याच पद्धतीने ते 22 वर्षांपासून ते हे काम करत आहे. पण जे दर खुर्ची विणण्याचे (cane material) काही वर्षांपूर्वी मिळत होते तेच दर आजही मिळत आहे. यातून त्यांना एका खुर्ची मागे अडीचशे तीनशे रुपये मिळतात. हे दर वाढवून देण्याची मागणी ते करत आहे. तसेच आज त्यांचा मुलगा बँकेत डेप्युटी मॅनेजर (cane objects) आहे आणि मुलगी मेडिकल कॉलेजला तृतीय वर्षाला शिकत आहे. पण असे असले तरी आजही ते संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले काम नियमित सुरू राहावं यासाठी अविरतपणे धडपडत आहे. डोळ्याने दिव्यांग असले तरी डोळस कामगिरी करून ते अनेकांसाठी प्रेरणा देणारे ठरत आहे.