Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता?

Maharashtra Political Crisis​ : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Updated: Jul 20, 2022, 08:16 AM IST
Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता? title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरू केलेल्या आमदारांच्या अपात्रता कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप धुडकावल्याबद्दल दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. 

न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांचाही खंडपीठात समावेश आहे. तर ओबीसी प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या कोर्टापुढे होणार आहे. राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, याचा फैसला आजच होण्याची शक्यता आहे.