Afzal Khan Tomb - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझाल खान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय. मरणानंतर वैर संपतं, या तत्वानुसार अफझाल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chatrapati Shivaji Maharaj ) आदेशानंच ही कबर बांधण्यात आली. पण काळाच्या ओघात कबरीभोवतीचं बांधकाम वाढत गेलं. इतकं की एका पत्र्याखाली मावेल इतकी छोटी कबर अचानक महालात रुपांतरित झाली( Afzal Khan Tomb) . पण याच अनधिकृत बांधकामावर सरकारनं हातोडा मारला. आजच्याच दिवशी म्हणज 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्याच शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत कबरीभोवतीच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सरकारचा हा सर्जिकल स्ट्राईक ( Surgical Strike On Afzal Khan Tomb) मानला जातोय.
आज शिवप्रतापदिनीच सरकारकडून कबरीवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. सकाळच्या पहिल्या किरणासह कारवाई सुरु झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धडाकेबाज निर्णयाचं शिवप्रेमींसह इतिहासकारांनीही स्वागत केलं.
महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफझल खानाची कबर बांधायचे आदेश दिले. धार्मिक सहिष्णुतेचं इतिहासातलं हे सर्वोत्तम उदाहरण. पण काळाच्या ओघात त्याच कबरीभोवती अतिक्रमण झालं, कबरीचं उदात्तीकरण झालं. पण शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत सरकारनं अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. ज्यादिवशी महाराजांनी अफझाल खानाचा कोथळा काढला त्याचदिवशी अफझलच्या कबरीभोवतीचा अनधिकृत भाग पाडण्यात आला. त्याचं शिवप्रेमींकडून स्वागत होतंय.
दरम्यान, आजच्या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिवप्रेमींकडून कौतुक केलं जातंय.