पुरंदर, पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर समस्या होत चालली आहे. (Coronavirus in Maharashtra) राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. आता कडक कारवाईचा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे. आता पुण्यातील पुरंदरमध्ये एक नामी शक्कल लढविण्यात आली आहे. कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी विशेष भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून होम आयसोलेशन रुग्णांच्या घरी अचानक भेट देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. (Surprise visit to the patient's home in Home Isolation) जर रुग्ण घरी नसेल किंवा बाहेर फिरताना दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पुरंदर प्रशासनाना कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ANC सासवड नगर पालिका हद्दीमध्ये होम आयसोलेशनमधील रुग्णांनी आयासोलेशन संदर्भातील नियम पाळले नाहीत किंवा असे रुग्ण इतरत्र फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय पुरंदरच्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे.
पुरंदर तालुक्यात रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही. अशा वेळी कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयासोलेशनचां पर्याय दिला जातो. मात्र हे रुग्ण विलगीकरणाचे नियम न पळता गावात मुक्तपणे फिरताना आढळून येत आहेत. अशा रुग्णाना चाप लावण्यासाठी या पुढे कडक कारवाई केली जाईल, आसा निर्णय पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी घेतला आहे. यासाठी रुग्ण असलेल्या ठिकाणी अचानकर भेट (Surprise visit) दिली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.