पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात तेव्हा... सुशीलकुमार शिंदेंचा टोमणा

शरद पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरच काही असतं,

Updated: Feb 7, 2018, 07:19 PM IST
पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात तेव्हा... सुशीलकुमार शिंदेंचा टोमणा title=

सोलापूर : शरद पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरच काही असतं, असा टोमणा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे. तसंच शरद पवारांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते, असंही शिंदे म्हणाले. पवार चलाख आहेत. त्यांना वाऱ्याची दिशा आधीच कळते, असं म्हणत शिंदेंनी पवारांचं कौतुक केलं. शरद पवार माझे गुरु असल्याचंही शिंदे म्हणाले.

सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुशीलकुमार शिंदेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रणिती शिंदे चांगलं काम करते पण काहीवेळा फटकन बोलते त्यामुळे अडचणी होतात, अशी कबुली शिंदेंनी दिली. पण मी गोड बोलतो आणि.... असं शिंदे म्हणाले आणि पत्रकार परिषदेत हशा पिकला.

नरेंद्र मोदींना मी जवळून पाहिले आहे. मी हिमाचलचा प्रभारी आणि ते मुख्यमंत्री असताना आमची भेट व्हायची. पण त्यांनी चहा विकल्याचं मी कधीच ऐकलं नाही. ते आत्ता चहावाले झाले असावेत, असा चिमटा सुशीलकुमार शिंदेंनी काढला. मोदी व्यक्तीगतरित्या चांगेल असले तरी योजना ठरवताना निर्णय चुकतो, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदेंनी दिली.