पिंपरी चिंचवड : चिखली मधील सेंट ऍनस स्कुलच्या शिक्षकाला पालकांनी मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्टाफी फ्रांसिस असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शाळेतून दाखल काढण्यासाठी महिला गेल्या असता फ्रांसिस याने अपशब्द वापरल्याचा महिलांचा आरोप करण्यात आला आहे. फ्रांसिस विरोधात महिलांचा चिखली पोलिस स्थानकात तक्रार अर्ज केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकाला पालकांची मारहाण झाल्याचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालं. महिलेला अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिखलीतल्या सेंट ऍनस स्कुलमधील घटना असून शिक्षकाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार करण्यात आली.
पिंपरी चिंचवडच्या चिखली मधील सेंट ऍनस स्कुल च्या संस्था चालकाच्या मुलाला पालकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. स्टाफी फ्रांसिस असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शाळेतून दाखल काढण्यासाठी महिला गेल्या असता फ्रांसिस याने अपशब्द वापरल्याचा महिलांचा आरोप आहे. फ्रांसिस विरोधात महिलांचा चिखली पोलिस स्थानकात तक्रार अर्ज ही दाखल केला आहे.
या महिला सोमवारी दिवसभर 10 तील पाल्यांचा दाखला घेण्यासाठी शाळेवर गेल्या होत्या. मात्र त्यांना दिवसभर शाळेत प्रवेश दिला नाही. सायंकाळी त्यांनी पुन्हा दाखल देण्याची विनंती केली. मात्र फ्रांसिस याने जुने नियम दाखवत दाखल देणार नसल्याचे म्हंटले. या वेळी त्याने महिलांशी उद्धट वागणूक केली आणि अपशब्द ही वापरल्याचा आरोप महिलांनी केला आहे. 10 वी च्या विद्यार्थ्यांचे दाखले फी साठी थांबवू नका असा सरकारचा आदेश असताना ही दाखल दिला गेला नाही. त्यातच फ्रांसिस याने अपशब्द वापरल्याने संतापलेल्या पालकांनी त्याला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी चिखली पोलिस अधिक तपास करत आहे.