पुणे : शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच होतील, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात स्पष्ट केलंय. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी शिक्षकांनी बदली विरोधात मोर्चे काढले होते.
हा विषय ग्रामविकास विभागाशी संबंधित असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच मध्यान्ह भोजनाचे टेंडर आठ दिवसात निघणार असून, शिक्षकांवरील हा भार लवकरच कमी होईल, असे ते म्हणालेत.
गुणवत्तेवर आधारित वेतनवाढ देण्याचा निर्णय हा १२ आणि २४ वर्षांनी येणा-या मोठ्या वेतनवाढीशी संबंधित असून, शिक्षकांनी त्याचा बाऊ करु नये, असंही तावडे म्हणालेत.