धक्कादायक... केमिकल कंपनीला भीषण आग

एका कर्मचाऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

Updated: Sep 16, 2021, 01:09 PM IST
धक्कादायक...  केमिकल कंपनीला भीषण आग

पुणे : पुण्यातील एका कंपनीत भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीला आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ कंपनी आहे. .घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. एका कर्मचा-याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश हाती लागलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीला आग लागली तो Sparkling candles बनवण्याचा कारखाना होता. 18 कामगार त्याठिकाणी काम करत होते. एकाचा मृत्यू झाला. इतर बाहेर पडले आहेत. आता आग जवळ-जवळ विझली आहे.