ठाण्यात लोकलमध्येच महिलेची प्रसुती

झेबा परवीन अन्सारी असं या महिलेचे नाव असून ती टिटवाळा इथली रहिवासी आहे.

Updated: May 6, 2018, 08:58 AM IST

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा इथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला. मध्यरात्री बारा ते सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. नवजात बालिका आणि तिची आई दोघीही सुखरुप आहेत. त्यांना उपचारार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय. झेबा परवीन अन्सारी असं या महिलेचे नाव असून ती टिटवाळा इथली रहिवासी आहे. सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात तपासणी करुन झेबा घरी परतली. मात्र तिथे पोहचल्यानंतर झेबाला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. 

त्यामुळे रात्री तिच्या सासू आणि पतीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी नेत असता, मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास लोकल ठाण्यात आल्यावर झेबा हिने लोकलमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला.