ठाणे : ठाण्यात आजपासून जांभळी नाक्यावरच्या शिवाजी मैदानात बिर्याणी फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टीव्हल आहे. संध्याकाळी 5 ते 11 या वेळेत इथे विविध प्रकारच्या बिर्याणी चाखायला मिळणार आहे.
दिल्ली, हैदराबादी, अवधी, फिश अशा विविध प्रकारच्या प्रसिद्ध बिर्याणी इथे मिळत आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या बिर्याणी खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. तसंच इटालियन, मेयॉनिज, खेकडा बिर्याणी हेही विविध वेगळे प्रकार इथे चाखायला मिळतील.