close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ठाण्यात मोफत मॅमोग्राफी टेस्टची सोय

ठाणे महापालिकेतर्फे ब्रेस्ट कॅन्सरची  विनामूल्य तपासणीची सोय खुली करण्यात आली आहे.

Updated: Nov 1, 2017, 04:21 PM IST
ठाण्यात मोफत मॅमोग्राफी टेस्टची सोय

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे ब्रेस्ट कॅन्सरची  विनामूल्य तपासणीची सोय खुली करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेचं कळवा इथल्या शिवाजी छत्रपती  हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करणारं मॅमोग्राफी मशीन बसवण्यात आलंय. या मशीनच्या मदतीनं ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यात येतं. ही तपासणी महिला डॉक्टर्स आणि कर्मचा-यांमार्फतच केली जाते. ही सेवा विनामूल्य सुरू करण्यात आलीय.

 हे मॅमोग्राफी मशीन एखाद्या व्हॅनमधून ठिकठिकाणी पोहोचवून त्यामार्फत घरोघरी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.