ठाण्यातील रेव्ह पार्टीचं 'गोवा गील' कनेक्शन! गर्दुल्ल्याला श्रद्धांजली देण्यासाठी..; धक्कादायक खुलासा

Thane Rave Party: या रेव्ह पार्टीसाठी इन्स्टाग्रामवर पाठवण्यात आलेल्या इनव्हीटेशनमध्ये वापरण्यात आलेले कोड वर्ल्डस आणि फोटोंसंदर्भातील नवीन खुलासा समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 2, 2024, 08:30 AM IST
ठाण्यातील रेव्ह पार्टीचं 'गोवा गील' कनेक्शन! गर्दुल्ल्याला श्रद्धांजली देण्यासाठी..; धक्कादायक खुलासा title=
ठाण्यातील पार्टीसंदर्भात धक्कादायक खुलासा

Thane Rave Party: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी ठाण्यातील कासारवडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवा गील नावाच्या एका गर्दुल्या विदेशी बाबाला आदरांजली अर्पण करण्यासाच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काही कोड वर्ल्डसच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ही पार्टी गोवा गीलच्या स्मरणार्थ हा रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 23 ऑक्टोबर रोजी गोवा गीलचं निधन झालं. अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोवा गीलला श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र येऊन अंमली पदार्थांचं नशा करणं महागात पडलं आहे.

सर्वजण आयटी आणि कॉल सेंटरमधील

कासारवडवलीमध्ये ठाणे खाडीच्या किनारी निर्जन स्थळी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीवर छापा टाकून पोलिसांना तेजस कुबल, सुजल महाजनसहीत एकूण 95 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, साहय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदेंच्या पथकाने या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. हे सर्व तरुण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कॉल सेंटरमध्ये काम करणारे आहेत. तेजस आणि सुजलबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या पार्टीसाठी तरुणांना आमंत्रित करण्यामध्ये इतरही काहीजणांचा समावेश होता अशी माहिती समोर आली आहे. 

कोण आहे हा बाबा?

पार्टीच्या डिजीटल इनव्हीटेशनमध्ये फोटो आणि कोड वर्ड्सच्या माध्यमातून ही रेव्ह पार्टी असल्याचं सुचित करण्यात आलं होतं. अमली पादर्थांचे सेवन, डीजेसंदर्भातील संकेत आणि अमली पदार्थांच्या तस्करांना ठाऊक असलेले संकेत या पोस्टमध्ये होते. या पोस्टमध्ये गोवा गील नावाच्या परदेशी बाबाचाही उल्लेख होता. हा बाबा विदेशातून गोव्यामध्ये वास्तव्यासाठी आला होता. 2 महिन्यांपूर्वी या बाबाचं निधन झाल्याने त्याला आदरांजली वाहण्याच्या नावाखाली या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

इनव्हाइटवर जंगलाचे फोटो

इस्टाग्राम पोस्टमध्ये पार्टीच्या इनव्हीटेशनवर वाघ, साप, जंगलाचे फोटो होतो. म्हणजेच ही पार्टी निर्जनस्थळी अगदी जंगलामध्ये आयोजित करण्यात आल्याचं या माध्यमातून सूचित करण्यात आलं होतं. ठाणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये 95 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात 5 तरुणींचाही समावेश आहे. या सर्वांची नावं आणि पत्ते पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावून या सर्वांना पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.