कोल्हापुरात भर रस्त्यात तरुणीची छेड, तरुणाला चोपले

भरधाव  मोटरसायकलवरून तरुणीची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. छेड काढल्यानंतर संतापलेल्या तरुणीनं आपल्या स्कूटरवरून या तरुणाचा पाठलाग केला. एवढंच नव्हे तर त्याला गाठून रस्त्यावर थांबवून भरचौकात चोप दिला. 

Updated: Mar 13, 2018, 07:36 PM IST
कोल्हापुरात भर रस्त्यात तरुणीची छेड, तरुणाला चोपले

कोल्हापूर : भरधाव  मोटरसायकलवरून तरुणीची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. छेड काढल्यानंतर संतापलेल्या तरुणीनं आपल्या स्कूटरवरून या तरुणाचा पाठलाग केला. एवढंच नव्हे तर त्याला गाठून रस्त्यावर थांबवून भरचौकात चोप दिला. 

सीसीटीव्हीत कैद 

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी याठिकाणी हा प्रकार घडला. ही युवती धाडसी होती म्हणून या टवाळखोराला कोल्हापुरी हिसका दाखवला. मात्र कोल्हापुरात रोजच तरुणींची मोटरसायकस्वारांकडून छेड काढण्याच्या घटना सर्रास घडतात. 

टवाळखोर तरुण

या टवाळखोरांना घाबरून त्या कुठेही तक्रार करण्याचं धाडस दाखवत नाहीत. संरक्षणाच्या बाता मारणाऱ्यांनी अशा टवाळखोर तरुणांना जरब बसेल अशा पद्धतीची कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे