राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६५,१६८

राज्यात ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Updated: May 30, 2020, 08:58 PM IST
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६५,१६८  title=

मुंबई : राज्याच कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ६५,१६८ पर्यंत पोहोचला आहे. आज राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे १०८४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण २८,०८१ कोरोना बाधित रूग्ण घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

राज्याचा रूग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता. तो आता १७.५ पर्यंत पोहोचला आहे. देशाचा रूग्ण दुपटीचा वेग हा १७.१ असा आहे. त्याचप्रमाणे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७% एवढं आहे. राज्यात मृत्यू दर ३.३७% इतका आहे. 

सध्या राज्यात ५,५१,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्क क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,४२० लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.