Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. आता मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. टेक्सटाइल कमिश्नर कार्यालयाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत थेट मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सरकारला याबाबत जाब विचारला आहे. (Political News)
जयंत पाटील यांनी टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय मुंबईतून दिल्लीत न्यायाच् प्लान केला जात आहे, या संदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थितीत केला आहे. तर मुंबईतील अनेक कार्यालय बाहेर न्यायाचे प्लान हा हाणून पाडावा लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. ते म्हणाले, टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत जात आहे. मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस होत आहे. याला उभारी द्यायची गरज होती. 2014 नंतर महाराष्ट्रातील अनेक उद्योग, महत्वाची कार्यालये गुजरातमध्ये गेली. टेक्सटाइल ऑफिस हे जर दिल्लीला नेले जात असेल तर महाराष्ट्र कसा खिळखिळा होत आहे हे आता जनतेने पाहावे.
विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे, निसर्ग कोपाने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. ही खंत आहेत. कोकणात खूप पाऊस पडतो आणि रस्ते खराब होतात. पण 1992-93 मध्ये एन्रॉन कंपनीने रस्ते बांधले ते अजून जशास तसे आहेत. मग तसे रस्ते आज का बांधले जात नाहीत, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
कोकणात फार मोठी आपत्ती आली. शेतकरी उध्वस्थ झाला पण ते कधी आत्महत्या करत नाहीत. त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यासाठी सरकारने एक गट नेमावा. जेणे करून त्याची मदत विदर्भ व मराठवाड्यासाठी होईल. नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर मी काही बोलत नाही. राज्यात, केंद्रात तुमचे सरकार असताना असे आक्रोश मोर्चे तुम्हाला काढावे लागत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय यांचे हिंदुत्व लंगडे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवाय यांचे हिंदुत्व नकली आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे काही बोलायचे होते ते बोलून गेले. एकत्र निवडणुका घ्यायला भाजपला कोणी विरोध केला आहे. आजच एकत्र निवडणुका घ्या, असे थेट आव्हान जाधव यांनी दिलेय.