केंद्र सरकारचा आक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचा आदेश राज्य सरकार मागे घेणार

महाराष्ट्रात इतर राज्यातून एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Updated: Dec 1, 2021, 06:03 PM IST
केंद्र सरकारचा आक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचा आदेश राज्य सरकार मागे घेणार

दीपक भातुसे, मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) पत्रानंतर मंगळवारी रात्री उशिरा काढलेला आदेश राज्य सरकारने (State Government) मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी (International passenger) लागू असणारा आदेश मागे राज्य सरकार मागे घेण्याची शक्यता आहे.

या आदेशानुसार महाराष्ट्रात इतर राज्यातून एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) बंधनकारक करण्यात आली आहे. कोव्हिडं चाचणी निगेटीव्ह असतानाही 14 दिवस होम कोरंटाईन (Home Quarantine) बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) कनेक्टिंग फ्लाईट घेणाऱ्याला ही आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना 48 तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल सोबत बाळगणं बंधनकारक करण्यात आले आहे.

या आदेशावर केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारकडून आदेश मागे घेण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.