Palava flyover works delay: कल्याण ग्रामीण मतदारसंघातील पलावा उड्डाणपुल रेल्वेचा मेगाब्लॉक मिळत रखडला आहे. हा उड्डाणपुल झाल्यास कटाई, पलावा या महामार्गातील वाहतूक कोंडीतुन सुटका होणार आहे. जवळपास चार ते पाच वर्षापासून या पुलाचे काम रखडले आहे. या उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.
2018 साली भूमिपूजन होऊन देखील उड्डाणपुलाचे काम 50 टक्के देखील पूर्ण झालेले नाही .या भागातील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ठिकाणी ठेकेदाराला बोलवून त्याची चांगलीच कान उघडणी केली. क्षमता नसतांना देखील या ठेकेदाराला हे काम दिल्याने या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे.
शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत भेट घेत या संबंधी माहिती दिली. मात्र, रेल्वेचा मेगाब्लॉक मिळत नसल्याने या उड्डाणपुलाचे काम रखडल्याचे मनसे आमदार राजू पाटील स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वेचं सहकार्य मिळाल्यास उड्डाणपुलाचे काम लवकर मार्गी लागेल.तर दुसरी ठेकेदाराच्या संथ गतीने काम सुरू असल्याने त्यात अधिक भर पडत आहे,त्यामुळे ठेकेदाराला दंड आकारणार असल्याचे एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात शिळफाटा कल्याण रस्ता सहा पदरी केल्याने येथील वाहतुकीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सोबतच या भागातील वाहतूक अधिक वेगवान व्हावी, यासाठी येथे मुंब्रा वाय जंक्शन पुल उभारण्यात आला. येथेच ऐरोली - काटई उन्नत मार्ग, शिळफाटा उड्डाणपूल उभारला जात आहे. शेजारी महापे रस्त्यावर जाण्यासाठी असलेल्या पाईपलाईन रस्त्यावर उड्डाणपूल उभारून कोंडीमुक्त वाहतूक केली जाणार आहे.
या बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई ते काटई येथील ४५ मिनिटांचे अंतर केवळ पाच ते दहा मिनिटांवर येणार आहे. या ऐरोली काटई उन्नत मार्गाची एकूण लांबी 12.3 किलोमीटर इतकी आहे. यातील पहिला टप्पा - ठाणे बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा एकूण 3.43 किलोमिटर लांबीचा आहे. तर या मार्गातील बोगदा 1.68 किलोमीटरचा आहे. त्यामुळे येत्या काळात येथील वाहतुक वेगवान होणार आहे