पायी वारी सोहळ्यात चोरी, व्हीडिओ व्हायरल

माऊलींच्या रथाची आणि रथात विराजमान असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी धाव घेत असतात. याच गर्दीचा फायदा चोरटे घेत आहे. 

Updated: Jun 25, 2022, 11:29 PM IST
पायी वारी सोहळ्यात चोरी, व्हीडिओ व्हायरल title=

विशाल सवने, झी २४ तास, पुणे : ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जात आहेत. तसंच अनेक संतांच्या पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र या भक्तिमय वातावरणात चोरटे आपला हेतू साध्य करत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्या व्हिडिओमध्ये एक चोरटा एका भक्ताच्या गळ्यातली सोन्याची चैन आहे. (theft at pai wari ceremony video goes viral)

पालखी सोहळ्यात चोट्यांचा सुळसुळाट

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी एक एक टप्पा पार करत पंढरी कडे जात आहे. वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी आणि लाखोच्या संख्येने स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची आणि रथात विराजमान असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी धाव घेत असतात. याच गर्दीचा फायदा चोरटे घेत आहे. 

अगदी वारकऱ्यांच्या वेषात चोरटे चोऱ्या करत आहेत. या व्हिडिओमध्ये नीट पहा माऊलींच्या पालखीचा रथ समोर येतो. रथात असणाऱ्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी अनेक स्थानिक रहिवासी पुढे सरसावतात. 

निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण माउलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी पुढे जातो. या तरुणाच्या गळ्यात सोन्याची चैन आहे. तो माउलींच्या पादुकांना स्पर्श करत असतो. 

इतक्यात मागे उभे असणाऱ्या एका चोरट्याने तरुणाच्या गळ्यात असणाऱ्या चैनवर हात साफ करण्याचा प्रयत्न केला. पण चैन काही तुटली नाही. दाताने त्याने चैन तोडली आणि जणू काही झालंच नाही ही अशा भावात तो पसार झाला. मात्र आपल्या गळ्यातली चैन चोरीला गेली आहे हे त्या तरुणाच्या लक्षात आलं. पण नेमका चोर कोण हे कळलाच नाही.

पोलिसांकडून आवाहन

पोलिसांनी अनेक ठिकाणी चोरांपासून सावध व्हा अशा स्वरूपाचे बोर्ड लावले आहेत. गर्दीच्या ठिकाणी येताना मौल्यवान वस्तू परिधान करून येऊ नये अशा सूचना देखील वारंवार दिल्या आहेत.