महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज

महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.  2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात, झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा हा अंदाज आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 3, 2024, 12:02 AM IST
महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज title=

Exit Poll Results Lok Sabha Election 2024:  संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे.  महाराष्ट्रात 48 जागांसाठी लोकसभेची लढत झाली. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता. झी मीडियाच्या AI एक्झीट पोलने हा अंदाज वर्तवला आहे. 

झी मीडियाच्या AI एक्झीट पोलच्या अंदाजानुसार 2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात. यंदा महाराष्ट्रातही महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा  41 वरुन 26 ते 34 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा 5 वरुन 15 ते 21  वर जाण्याची शक्यता आहे.

झी 24तासच्या एआय एक्झिट पोलमध्ये एनडीएला उत्तरेकडे धक्का  तर दक्षिणेत सहारा मिळण्याची शक्यता

झी 24तासच्या एआय एक्झिट पोलमध्ये एनडीएला उत्तरेकडे धक्का  तर दक्षिणेत सहारा मिळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यात एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील तामीळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशमध्ये एनडीएच्या जागा वाढू शकतात...पश्चिम बंगालमध्येही काही प्रमाणात एनडीएच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे...टीएमसीला मागे टाकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे.

झी 24 तासचा हा सगळ्यात हटके एक्जिट पोल आहे. कारण यात आम्ही थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली आहे. तब्बल 10 कोटी लोकांची सँम्पल साईज असलेला हा देशातला सगळ्यात मोठा एक्जिट पोल आहे. हा एक्जिट पोल तयार करताना AIचा वापर करुन सोशल मीडियावरील 32 लाख पोस्टचं सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. इतकंच नाही तर देशातल्या 1 हजार उमेदवारांच्या संपूर्ण प्रोफाईलचीही माहिती धुंडळून काढलीय. इतकंच नाही तर तब्बल 10 कोटी लोकांची मतं जाणून घेतलीयत. ही एआय तंत्रज्ञान तितकंच विश्वासार्ह आहे.. कारण याआधी या पद्धतीचा वापर 5 देशांनी केलाय. म्हणजेच अमेरिका, मेक्सिको, ब्राजील, अर्जेंटीना और साइप्रस या देशातल्या निवडणुकांवेळी ही एआयपद्धत वापरण्यात आलीय. अमेरिकेत 2016 आणि 2020 च्या निवडणुकांमध्ये या AI एक्जिट पोलचा वापर करण्यात आलाय.

लोकसभा निवडणूक निकालाआधी समोर आलेल्या एक्झिट पोलवर राहुल गांधी यांनी टीका केलीये...हा एक्झिट पोल नाही, तर मोदींचा मीडिया पोल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलीय. हा मोदींचा फँटसी पोल असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. इंडिया आघाडीच्या जागांवर बोलताना त्यांनी सिद्धू मुसेवालाचं गाणं ऐकला का? असा सवाल केला.