आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : अट्टल दुचाकी चोरट्याने थेट चोरलेली वाहने ओएलएक्सवर(OLX ) विकल्याचा प्रकार चंद्रपूर(Chandrapur) शहरात उघडकीस आला आहे. चंद्रपूर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता मोहीम राबवली आहे. याच दरम्यान एका मनोरंजन मेळ्यातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु असताना चोरीचे वाहने OLX वर विकली जात असल्याचे उघडकीस आले.
चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु असताना पोलिसांना हा OLX वर वाहने विकणारा चोर सापडला. या चोरट्याकंडून नागपुरातील इसमाने ओएलएक्सवर बाईक खरेदी केली. नागरिकांनी मूळ कागदपत्रे व मालकाची खातरजमा करून दुचाकी खरेदी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चंद्रपूर शहर , बल्लारपूर आणि नागपुरात हा चोरटा बाईक चोरत होता. चोरट्याने चोरलेली वाहने थेट ओएलएक्स वेब साईटवर विक्रीसाठी टाकली. नागपुरातील इसमाने ओएलएक्सवर दुचाकी खरेदी केली. मात्र, विमा काढताना मूळ मालकाला मेसेज गेल्याने हे बिंग फुटले. पोलिसांनी राहुल ठाकूर नावाच्या चोरट्याला अटक करत त्याच्याकडून 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. नागरिकांनी मूळ कागदपत्रे व मालकाची खातरजमा करून दुचाकी खरेदी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.