महिलेला ३ ते ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जिल्ह्यातल्या परळी शहरामधल्या अशोक नगर भागात एका इराणी महिलेला तीन ते चार जणांनी जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 05:31 PM IST
महिलेला ३ ते ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न title=

बीड : जिल्ह्यातल्या परळी शहरामधल्या अशोक नगर भागात एका इराणी महिलेला तीन ते चार जणांनी जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. परळी शहरातल्या अशोक नगर भागात राहणाऱ्या शेख शबाना या 36 वर्षीय महिलेला तिच्याच शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी शुक्रवारी घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.

महिलेची एक क्लिप व्हायरल

यात शेख शबाना 60 ते 65 टक्के भाजली असून, तिला अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. उपचार सुरू असताना या महिलेची एक क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये तिने आपल्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत पोलीस हजर होते असा आरोप केला आहे. 

पोलिसांकडून आपल्या कुटुंबाला धोका

संबंधित पोलिसांकडून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचंही तिनं यात म्हटलं आहे. या प्रकरणी चौकशी करत असल्याचं, पोलीस अधीक्षकांनी सांगतिलंय. आधी सांगली त्यानंतर लातूर आणि आता बीडमध्येही पोलिसांवर आरोप झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.