ट्रॅक्टर - ट्रॅक्स अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 9 जखमी

अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी

Updated: Oct 23, 2018, 11:56 PM IST
 ट्रॅक्टर - ट्रॅक्स अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 9 जखमी title=

भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने ट्रॅक्सला दिलेल्या धडकेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झालेत. अरुणा मोहनकर,कल्पना सरोदे आणि वंदना गोपाले अशी मृत महिलांची नावं आहेत.

पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असला तरी चालक मात्र फरार झालाय. जिल्ह्यात वाळूमाफियांचा खुलआम वावर सुरू असून पोलिसांना चुकवण्यासाठी अनेकदा बेफामपणे ट्रक-ट्रॅक्टर चालवले जातात. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असली तरी माळुमाळियांच्या या मनमानीकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होतंय.