कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षांच्या लहानग्याचा दुर्दैवी अंत झालाय. 

Updated: Jan 21, 2018, 08:22 PM IST
कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अहमदनगर : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षांच्या लहानग्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यातल्या टाकळी मिया इथे घडली आहे.

चाळीसगावचे रहिवासी असलेले ऊस तोडणी कामगार, नगर जिल्ह्यातल्या प्रवरा साखर कारखान्यात ऊस तोडणीकरता आले होते. त्यांच्यातल्या नितीन रोहीदार राठोड या  तीन वर्षांच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करुन नितीनचं डोकं, तोंड आणि मांडीवर अनेक चावे घेतले. कुत्र्यांच्या या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला.