मुंबई : महाराष्ट्रात आज (1 मे) कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १००८ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११ हजार ५०६ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाच्या २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यांची संख्या ४८५ वर पोहोचली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्यात चिंता आणखी वाढल्या आहेत. देशात आज पुन्हा २ आठवडे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे १७ मेपर्यत हा लॉकडाऊन राहणार आहे.
दिनांक आणि रुग्णांची वाढलेली संख्या
२६ एप्रिल २०२० ८११
२७ एप्रिल २०२० ४४०
२८ एप्रिल २०२० ५२२
२९ एप्रिल २०२० ७२८
३० एप्रिल २०२० ५९७
०१ मे २०२० १००८
नवी मुंबईत आज कोरोनाचे २० रुग्ण वाढले. एकूण रुग्णाची संख्या २५० वर
अकोल्यात कोरोनाचे ४ रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या ३२ वर
औरंगाबादमध्ये ३२ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. एकूण रुग्णांची संख्या २०९ वर
पनवेलमध्ये आज नवीन 12 रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या ८१ वर
लातूरच्या उदगीरमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, उदगीरमध्ये एकूण ०८ पॉझिटिव्ह रुग्ण.