अमरावती : राज्यात कोरोना (COVID-19) पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागपूर सह अनेक जिल्ह्यात उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण आता अमरावतीमध्ये उपचार घेत आहे. शासनाच्या सुपर स्पेशलीटी व पीडीएमसी रुग्णालयात 70 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे तर इतर काही खाजगी रुग्णालयात देखील अनेक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. (Treatment of 150 corona patients in Amravati including Nagpur, again straining the district health system)
अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही पुन्हा वाढू लागली आहे. तर त्यात काल तब्बल तेरा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे त्यामुळे खबरदारींचा उपाय म्हणून आता इतर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाना अमरावती जिल्ह्यातील मात्र उपचारासाठी बंदी घातली जाऊ शकते. जर बाहेर जिल्ह्यातील रुग्णाना उपचारासाठी भर्ती करून घेतले तर जिल्ह्यातील रुग्णांना बेड मिळने कठिण होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई पुणे नागपूर सह आदी जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर पुण्यामध्ये अक्षरशा रेमडीसीवीर इंजेक्शन साठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर आता अमरावतीतही इंजेक्शन साठी सकाळ पासुनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल समोर मोठी रांग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. परंतु दुपारी बारा वाजेपर्यंत ही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला.