VIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...

Viral Video :  नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

Updated: Jan 15, 2023, 07:03 PM IST
VIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात... title=
Trending boy doing stunts on scooter accident shocking nagpur Crime video viral on Social media

Trending Video :  नागपूर (Nagpur news) जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांचं नागपूर कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतं. नागपूरला क्राईम सीटी म्हणूनही ओखळलं जातं. कारण इथे मोठ्या प्रमाणात गुन्हे (Nagpur Crime) घडतं असतात. पण यात नागपुरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. तो पाहून नेटकरी नागपूरच्या पोट्ट्यांची खिल्ली उडवतं आहे. विदर्भातील भाषा ही अनेकांना मजेशीर वाटते. पोट्टे म्हणजे मुलं...तर या तरुणांचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

शाईन मारणं पडलं महागात 

तरुण पिढीला शाईन म्हणजे स्टाइल मारायला लय भारी वाटतं. त्यामुळे अनेक वेळा ते आपल्या जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण स्कूटरवर स्टंट (Stunt Video) करताना दिसतं आहेत. त्यांच्या मागून जाणाऱ्या एका कारमधून त्यांची ही मस्ती कॅमेऱ्यात कैद केली. या तरुणांना रस्त्यावर स्टंट करणे महागात पडले. कारण हे तरुण स्कूटरवर वाकडी तिकडी चालवत जात असताना एका क्षणी ते खाली आदळतात. त्यांचा अपघात होतो. नशिबाने कारचालकाच्या गाडीवर नियंत्रण होतं. ती कार लगेचच थांबली नाही तर अनर्थ झाला असता. या प्रकारे रस्त्यावर स्टंट करुन स्वत: च्या जीवासोबतच रस्त्यावरील इतर लोकांचा जीवही हे तरुण धोक्यात घालतात. (Trending boy doing stunts on scooter accident shocking nagpur Crime video viral on Social media) 

व्हिडीओ व्हायरल 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ nagpurs_club या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स येतं आहेत आणि या व्हिडीओला तुफान व्ह्यूज मिळतं आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.