Sanjay Raut On Maharashtra government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे. राऊतांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत काही आरोप करु शकतात. दिवसातून तीन वेळेला ते आरोप करतात. मात्र सकाळी कोणता आरोप केला, हे त्यांना संध्याकाळी आठवत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राजापूर येथील पत्रकार वारीशे यांच्या हत्येवरून गंभीर आरोप केले आहेत. वारीशेंची हत्या ही थरकाप उडवणारी घटना आहे, ही राजकीय हत्या असून, हत्येमागे कोणत्या पक्षांचे लागेबांधे आहेत? घटनेवेळी सीसीटीव्ही का बंद होते ? याचा तपास व्हावा अशी मागणी केलीय. तर सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे, हे लोण रत्नागिरीत पोहोचल्याचा म्हणत राऊतांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
सत्यजित चव्हाण यांच्या घरावर एटीएसच्या धाडी कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गामध्ये राजकीय हत्येची परंपरा त्याच लोण रत्नागिरीपर्यंत पोहोचले आहे, असे यावेळी राऊत म्हणाले. वारीसे प्रकरणात कोणाचा हात आहे याचा तपास गतीने होणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नीट लक्ष ठेवावं अनेकांची नावे यात पुढे येते आहेत. येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आम्ही जाब विचारणार आहोत, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
आणीबाणी पेक्षा वाईट परिस्थितीत सध्या देशात सुरु आहे. देशात अस्तिरता करण्याचं काम सुरु आहे. Bbc वरील छापे हा माध्यमांना दिलेला इशाराच आहे, असे राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी सत्तासंघर्षावरील निर्णयावर भाष्य केले. आमच्या वकिलांनी बाजू भक्कम मांडली आहे. आम्ही जनतेत जाऊन कौल घ्यायला तयार आहोत. 2024 मध्ये पूर्ण पणे राजकीय परिवर्तन झालेलं असेल, असे संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी त्यांनी रत्नागिरीचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल. जे गेले त्यांना परत स्थान नाही, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.