मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बाईकवरुन दोघांची शर्यत; पोलिसांनी पकडताच समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai Western Express Highway: मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 2, 2023, 05:11 PM IST
मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बाईकवरुन दोघांची शर्यत; पोलिसांनी पकडताच समोर आली धक्कादायक माहिती title=
Two held for racing motorbikes on Western Express Highway Mumbai

Mumbai Western Express Highway:  मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (Western Express Highway) हा नेहमीच गजबजलेला असतो. तिथे नेहमीच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime News)

महामार्गावर बाईकची शर्यत

मुंबई पोलिसांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बाइकची रेस लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे. सलमान खान (29) आणि अशफाक इकबाल शेख अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांकडून 11 मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता एका धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रेस लावण्यात आलेल्या मोटारसायकल या चोरीच्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींनी पोलिसांना तसा जबाब दिला आहे. 

पोलिसांनी केली मोठी कारवाई

पोलिसांनी आरोपींकडून चार बाइक जप्त केल्या आहेत. त्यातील तीन स्पोर्ट्स बाइक आहेत. तर, 11 मोबाइल फोनही जप्त करण्यात आले आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक विशाल पलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरोधात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर आता भारतीय दंड संहिताअंतर्गंत कलम 379 चोरीसह अन्य कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोर्टाने सुनावली शिक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना कोर्टात सादर करण्यात आले आहे. कोर्टाने दोघांनाही पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

कारची धडक

दुसर्‍या घटनेत, सोमवारी पहाटे एका कारने दुसऱ्या कारला धडक दिली होती. या धडकेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. एसयुव्ही कारमधील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडलगत असलेल्या सागर व्हिला इमारतीजवळ पहाटे 1.35 वाजता ही घटना घडली.