अंगठी खरेदी करण्याचा बहाणा करत ज्वेलर्स दुकानात दोघींकडून चोरी, असा झाला भांडाफोड

Theft : Two girls arrested in Pune : ज्वेलर्सच्या दुकानात अंगठी खरेदी करण्याच्या बहाणा करत चक्क चोरी करणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.  

Updated: Mar 18, 2022, 08:47 PM IST
अंगठी खरेदी करण्याचा बहाणा करत ज्वेलर्स दुकानात दोघींकडून चोरी, असा झाला भांडाफोड title=
संग्रहित छाया

पुणे : Theft : Two girls arrested in Pune : ज्वेलर्सच्या दुकानात अंगठी खरेदी करण्याच्या बहाणा करत चक्क चोरी करणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन मुलींनी सोनाराची नजर चुकवून अंगठीची चोरी केली. (Two women held for stealing ring from jewellery shop in Pune )

 चोरीच्या आरोपाखाली दोन मुलींना सहकारनगर पोलिसांनी  अटक  केली आहे. आरोपी तरुणींनी  पारख ज्वेलर्समध्ये सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने अंगठी चोरुन नेली होती. याबाबत आनंद हरीलाल पारख  (47, बिबवेवाडी) यांनी फिर्याद  दिली होती. सहकारनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना अटक केले आहे..
 
सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल झाल्यानंतर तपास पथकने आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील 70 ते 75 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी दुकानातुन आंगठी चोरून पळून जाणाऱ्या दोन मुली एका ॲक्टिवा गाडीवरुन एलोरा पॅलेस कडून सातारा रोडने कात्रजकडे जाताना दिसल्या. 

गाडीचा शोध घेतला असता गाडी आंबेगाव पठार येथील असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी तरुणी या नारायणीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचून दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली. 

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघींकडून 45 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सहकारनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आली आहेत.