डोंबिवलीत नाल्यात २ तरूण वाहून गेले

डोंबिवलीच्या नांदीवलीतील नाल्यात २ तरूण वाहून गेले आहेत, वाहून गेलेल्या तरूणांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे.

Updated: Jul 11, 2018, 12:14 AM IST

डोंबिवली : डोंबिवलीच्या नांदीवलीतील नाल्यात २ तरूण वाहून गेले आहेत, वाहून गेलेल्या तरूणांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे नाल्यांना पूर आला आहे. मित्राला वाचवताना दुसरा तरूण देखील वाहून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अग्निशमन दलाकडून या तरूणांचा शोध सुरू आहे. हर्षल जिमकर हा तरूण नाल्यात बुडाला, त्याला वाचवताना त्याचा मित्र देखील वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने हे तरूण वाहून गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई आणि उपनगरा आज सकाळपासूनच पाण्याचा जोर होता, त्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, तर पश्चिमेला वसई, पालघरमध्येही पावसाचा जोर होता.