close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उदयनराजे भोसले संतापलेत, म्हणाले 'कुणीही अडवू शकत नाही?'

खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. आता त्यांनी शहरातल्या मंगळवार तळ्यात गणेश विर्सजन करण्याचा आग्रह धरला असून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही, असा पवित्रा घेतलाय. 

Updated: Sep 14, 2018, 05:20 PM IST
उदयनराजे भोसले संतापलेत, म्हणाले 'कुणीही अडवू शकत नाही?'

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. आता त्यांनी शहरातल्या मंगळवार तळ्यात गणेश विर्सजन करण्याचा आग्रह धरला असून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही, असा पवित्रा घेतलाय. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या तलावामध्ये विसर्जनाची परवानगी आधीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली होती. मात्र नवे अधीक्षक पंकज देशमुख हे स्वतः चर्चेत येण्यासाठी बंदी घालत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय. मंगळवार तळं हे आपल्या मालकीचं असल्याचाही त्यांचा दावा आहे. कोर्टाचा अवमान झाला तरी मंगळवार तळ्यातच विसर्जन होईल, असंही उयनराजे म्हणाले. 

मंगळवार तळं ऐतिहासिक असल्यामुळे तिथं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीनं विसर्जन करावं, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र प्रशासनानं विसर्जनाला बंदी घातलीये. याखेरीज सरकारनं डॉल्बीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.