उदयनराजे आणि महसूल मंत्र्यांचा एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

 हा प्रवास नक्की विकास कामांची चर्चा होती ? का राजकीय चर्चा झाली ? याबाबत आता तर्क विर्तक लढवले जावु लागले आहेत.

Updated: Oct 29, 2018, 05:42 PM IST
उदयनराजे आणि महसूल मंत्र्यांचा एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण  title=

मुंबई : काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी 24 तास' ला दिलेल्या मुलाखती मध्ये साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांना भाजपचे दरवाजे उघडे असल्याचे सांगितलं होतं. आज रस्त्याच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या निमीत्ताने चंद्रकांतदादा पाटील साता-यात आले होते. यावेळी  खा.छत्रपती  उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या कार्यक्रमास उपस्थित होते.

मात्र कार्यक्रम संपल्यानंतर खा.छत्रपती उदयनराजे भोसले आणि महसूलमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एकाच गाडीतुन प्रवास केला.

अनेक तर्क वितर्क 

या एकत्र प्रवासामुळे साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय .एकाच गाडीतुन केलेला हा प्रवास नक्की विकास कामांची चर्चा होती ? का राजकीय चर्चा झाली ? याबाबत आता तर्क विर्तक लढवले जावु लागले आहेत.

एकुणच काय खा. उदयनराजें सारखा हुकुमाचा एक्का आपल्याच पक्षात असावा अशी धडपड आता भाजपा करताना पहायला मिळतेय.