तेव्हाच संभाजीनगर असं नामांतर करेल... पाहा जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतरावर केलं महत्त्वाचं वक्तव्य.

Updated: Jun 8, 2022, 08:56 PM IST
तेव्हाच संभाजीनगर असं नामांतर करेल... पाहा जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले title=

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये जाहीर सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर देखील वक्तव्य केलं. संभाजीनगर कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वचन दिलं आहे, ते मी विसरणार नाही, आणि ते केल्याशिवाय रहाणार नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray on sambhajinagar )

'आधी जे बोंबलतायत त्यांना सांगयचाय एक दीड वर्ष झालं आहे विधानसभेत ठराव मंजूर झालेला आहे. कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिला आहे. पण का होत नाही अजून.' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

'या शहराचं नुसतं नामांतर नाही तर संभाजीनगर जेव्हा या शहराचं नामांतर होईल तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अभिमान वाटेल असं हे नगर करेन असं वचन मी देतो. नावाला सार्थ असं माझं शहर असेल. केंद्राकडे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव आधी मंजूर करुन घ्या. आम्ही तुमचा सत्कार करु.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर बोलणार आहे. पाणीप्रश्न असतानासुद्धा तिथे पाठ फिरवण्याऐवजी त्याला सामोरं जातोय. कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. दहा दहा दिवसांनी पाणी येत होतं.'

'तुमच्या मनात येत असेल तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय पण आमच्या नळाला पाणी नाही. तर तुमचं ओघवतं वकृत्व आमच्या पाण्याचा हंडा भरणार आहे का. पण आता यात सुधारणा झाली आहे,'

'झारीतला शुक्राचार बसला आहे तो बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना बजावला आहे. एक जुनी योजना होती गंजून सडून गेली आहे, पण तिच्यासाठीही पैसे देत आहे. समांतर जलवाहिनी योजनेचं भूमीपूजन मी केलं होतं, त्याचा पाठपूरावा मी करेन असं मी तुम्हाला वचन दिलं होतं. ही योजना पूर्ण करण्याचं बजावलं आहे. एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही.'

'मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता तर त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता. आमच्या आधी पाच वर्ष तुम्हीच बसला होतात, का नाही त्यावेळेला योजना सुरु केली. पण प्रत्येकवेळा निवडणुक आली की तुमच्या तोंडावर काहीतरी फेकायचं, हे हिंदुत्व आम्हाला शिकवलं नाही.'

'रस्त्याच्या कामातही हात घालता आणि रस्त्येही सुधारत आहे. मेट्रोची गरज लागली तर त्यासाठीसुद्धा प्लान बनवण्याची तयारी सुरु आहे. पण शहराचं विद्रुपीकरण करुन मेट्रो करणार नाही. संभाजीनगराची शान वाढवण्याचं काम महाविकास आघाडी करेल हे वचन आज मी तुम्हाला देतो.'