सोलापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या १५ दरवाजांतून ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे.
तर नीरा नदी पात्रातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. असे एकूण एक लाख १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून या पाण्यांचा नीरा नरसिंह इथं संगम होत आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिलाय.
गेल्या तीन दिवसांपासून उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.