close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या आंबेगावमधील घटना

Updated: Jun 15, 2019, 06:30 PM IST
पुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव पुणे : आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रेम उर्फ प्रविण विजय पवार आणि काजल विजय पवार अशी मृत बहिण-भावाची नावे आहे.

वडगाव काशिंबेग येथील घोड नदीवर प्रेम उर्फ प्रविण व काजल हे दोघे चुलती, दोन मोठ्या भावंडासह कपडे धूण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या किना-यावर खेळत असताना प्रेमचा पाय घसरून तो नदीत पडला. प्रेम नदीत पडल्यामुळे त्याची बहिण काजल त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना तीदेखील घसरून  नदीतील पाण्यात पडली. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोघांनाही पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहे.