Narayan Rane | कोरोना ही मुख्यमंत्र्याची देण, नारायण राणेंचा जोरदार 'प्रहार'

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पूरपरिस्थितीवरुन राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.  

Updated: Jul 25, 2021, 05:23 PM IST
Narayan Rane | कोरोना ही मुख्यमंत्र्याची देण, नारायण राणेंचा जोरदार 'प्रहार' title=

चिपळूण : राज्यात झालेल्या पूरपरिस्थितीचा कोकणातील महाड (Mahad) आणि चिपळूण (chiplun flood) भागाला मोठा फटका बसला. या पूरस्थितीमुळे चिपळूण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्याचं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात दुकानातील सामनाचं नुकसान झालं. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. संसार उद्धवस्त झाले. या पूरपरिस्थितीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी पाहणी केली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), विधानसभा आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर पूरस्थितीवरुन जोरदार प्रहार केला. राज्यातील कोरोना ही मुख्यमंत्र्यांची देण असल्याचं राणे म्हणाले. (union minister narayan rane critisize to chief minister and administration over to chiplun flood)  
 
राणे नेमकं काय म्हणाले?  

राज्यात उद्भवलेल्या या भयावह स्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. यावर राणे म्हणाले की, "हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून पाऊस काय, वादळ काय, कोरोना काय, कोरोना ही त्यांचीच देण आहे. मुख्यमंत्री हे कोरोना घेऊन आले. पाय पाहायला हवं, पांढऱ्या पायाचा"

"राज्यात मुख्यमंत्री आणि प्रशासन नाही"

राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि प्रशासन नाही, अशा प्रकारची भयावह परिस्थिती आहे. पूरग्रस्त जनता ही जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. पण लोकांना याबाबत काहीच कल्पना दिली गेली नाही. पूरस्थितीचा धोका घेऊन  लोकांना सूरक्षित ठिकाणी हलवायला हवं होतं. खाण्यापिण्याची सोय करायला हवी होती. सरकारने नागरिकांची सोय करायला हवी होती. या सर्व प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे, असंही राणेंनी नमूद केलं.

"विविध प्रकारे योजनेतून मदत देण्याचा प्रयत्न करु" 

बाजारपेठेत विविध बाजूने पाणी येतं. त्यामुळे 2005 पेक्षा भयावह स्थिती आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी व्यापाऱ्यांची आहे. तसेच पुरामुळे ज्यांच्या घराची स्थिती खराब झाली. त्यांची पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यांना मी या संदर्भात निवेदन द्यायला सांगितलं. नुकसानग्रस्तांना आम्ही तिघेही राज्यात आणि केंद्रात चिपळूणकरांना विविध प्रकारे योजनेतून मदत देण्याचा प्रयत्न करु.