अहमद शेख, झी २४ तास, सोलापूर : माणसांच्या दुनियेतील दोस्तीचे किस्से तुम्ही ऐकले असतील. काही मित्र हे अगदी जिवाला जीव देणार असतात.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते मैत्री या शब्दाला जागतात. तर काही जण जाणिवपूर्व स्वार्थाने मैत्री करतात. पण हा मानवी स्वभाव झाला. मात्र प्राण्यांमध्ये मैत्री झाल्याचं किंवा तुम्ही तसं याआधी क्वचितच पाहिलं असेल. सोलापुरात अशीच एक अनोखी प्राण्यांमधील मैत्रीच दर्शन झालंय. (unique friendship between goat buffelo and dog in solapur)
जनावरांच्या कळपात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी हे त्रिकूट पाहा. म्हैस, शेळी आणि कुत्रा असं या मैत्रीचं त्रिकुट. लांबसडक शिंग असलेली म्हैस आणि तिच्या पाठीवर बसणारी ही शेळी अशी सवारी गावातून नेहमीच निघते. आणि त्यांच्या जोडीला असतो त्यांचा आणखी एक मित्र तो म्हणजे तपकिरी रंगाचा हा कुत्रा...हे तिघेही एकमेकांचे अतूट मित्र आहेत. कलागते कुटुंबातील हे तिघेही जण सदस्यच आहेत.
शेळी म्हशीच्या पाठीवर बसते. तर कुत्रा या दोघांची राखण करतो. रोज शेतात जातात. तसेच संध्याकाळी याच पद्धतीने परत येतात. या तिघांमध्ये प्रेम असल्याचं म्हशीची मालकिण सांगते.
शेळी, म्हैस आणि कुत्र्याची दोस्तीची कहाणी सोलापूरकरांना परिचीत झाली आहे. या त्रिकुटाची मैत्री पाहून सगळ्यांचेच मोबाईल आपसूक बाहेर येतात आणि या अनोख्या दोस्तीचं चित्रिकरण सुरु होतं. स्वार्थासाठी माणसांची मैत्री होते आणि तुटतेही. मात्र प्राण्यांमधील ही आगळी-वेगळी दोस्ती कधीच तुटायची नाय. एव्हढं मात्र खरं.