पुणे : लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढलीय. लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊनला माझा विरोध राहीलं असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जम्बो कोव्हीड सेंटर आता कॉन्ट्रॅक्टवर दिली आहेत. तिथं अजिबात चांगली परिस्थिती नाही.प्रायव्हेट डॉक्टरांना तिथं रेफर केलं जातंय. सरकारने स्वतः जम्बो कोव्हीड सेंटर चालवावं असे आंबेडकर म्हणाले.
शासन अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगितले ही परिस्थिती आहे.
गृहमंत्री यांना कोणी सांगितलं ? पार्टीने सांगितलं का ? कॅबिनेटमध्ये हा विषय झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे असे ते परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवर बोलले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात सत्तेत होते. उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. पण त्यांना कणा नाही. सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे. नवीन सरकार यावं असं माझं मत असल्याचे ते म्हणाले.
बंगाल निवडणुकीवर त्यांनी यावेळी भाष्य केले. मोदी हे आदेशांचे पायमल्ली करतायत. बंगालमध्ये एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही. त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी दिले. बंगालच्या लोकांना डिवचले तर चालतं नाही. मोदी वारंवार तिथं जाऊन त्यांना डिवचतायत.
मोदी जिथे जाऊन प्रचार करतील तिथे ममता यांच्या पाच सिट वाढत जातील असे आंबेडकर म्हणाले.
मागच्या सरकारने करकरे प्रकरण दडपले आणि आताही प्रकरण दडपताय. त्यावेळच्या कोणत्याच अहवालावर चौकशी होत नाही. भाजप यामध्ये कुठला पुढाकार घेत नाही असेही ते म्हणाले.