व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन दोन गटात तुफान राडा

objectionable WhatsApp status : व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन वाद शिरसोलीत तणाव वाढला आणि दोन गटात तुफान राडा झाला.  

Updated: Apr 17, 2022, 09:20 AM IST
व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन दोन गटात तुफान राडा  title=

जळगाव : objectionable WhatsApp status : व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन वाद शिरसोलीत तणाव वाढला आणि दोन गटात तुफान राडा झाला. आक्षेपार्ह व्हाट्सअ‍ॅप  स्टेटसवरुन हा वाद पेटला. (WhatsApp Status Rada) हा वाद विकोपाला गेल्याने तुफान हल्ला करण्यात आला. यावेळी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, येथे तणावपूर्ण शांतता आहे.

शिरसोलीत दोन गटात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या तर एक तरुण जखमी झाला आहे .एमआयडीसी पोलीस घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, जमाव जमल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला. सध्या तणावपूर्ण शांतता आहे. 

 दोन गटात व्हाट्सअप स्टेटसवरुन वाद उद्भवल्यानंतर दोन गटातून जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एक तरुण रस्त्याने मलीकनगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे. हनुमान जयंती निमित्त एकाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.