वना नदीच्या पात्रात चार जणांचा बुडून मृत्यू

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमधल्या वना नदीच्या पात्रात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. 

Updated: Sep 3, 2019, 01:40 PM IST
वना नदीच्या पात्रात चार जणांचा बुडून मृत्यू title=

वर्धा : जिल्ह्यातल्या हिंगणघाटमधल्या वना नदीच्या पात्रात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. हरतालिकाचे विसर्जन करण्यासाठी हे चौघे नदीवर गेले होते.

ही दुर्घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी नागपूरच्या एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.