Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा

Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं   

Updated: Feb 22, 2023, 08:16 AM IST
Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा title=
weather update Nagpur Mumbai to vitness highest temprature heat wave in february latest Marathi news

Weather Update : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार हे आता हवामान विभागानं दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. भारतील हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहिनुसार पुढील 48 तास महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण आणि (Mumbai Temprature) मुंबईच्या भागात उष्णतेच्या झळा अडचणी वाढवतील. या भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये तापमानातही लक्षणीय वाढ होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. 

मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागात तापमान 38 अंशापर्यंत जाऊ शकतं. फेब्रुवारी महिन्यात वाढलेलं हे तापमान पाहता पुढचा संपूर्ण उन्हाळा आणखी किती दाहक असेल याचीच प्रचिती येत आहे. 

विदर्भ तापला... तापमान 40 अंशांवर 

(Nagpur temprature) नागपूरमध्ये उन्हाच्या झळा आता घाम फोडू लागल्या असून, पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यातच नागपुरात 40 अंशांवर पारा गेल्यामुळं ही चिंतेची बाब ठरत आहे. उन्हाळ्याचा ऋतू अद्याप सुरु झालेला नाही. फेब्रुवारीत तर, थंडी ओसरताना दिसते. इथं मात्र चित्र वेगळं आहे. त्यामुळं ऐन (Summer) उन्हाळ्यात म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात परिस्थिती किती भीषण असेल याच विचारानं अनेकांना घाबरवून सोडलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

 

सहसा होळीनंतर (Holi 2023) होणारी तापमान वाढ यंदा 15 फेब्रुवारीनंतरच पाहायला मिळत आहे. त्यामुळं यंदाचा उन्हाळा चांगलाच गरम असणार असं म्हणायला हरकत नाही. 
 
राज्यातील प्रमुख शहरांमधील सध्याचं तापमान... 

नागपूर 37 अंश सेल्शिअस
पुणे 36 अंश सेल्शिअस
नाशिक 35 अंश सेल्शिअस 
मुंबई 32 अंश सेल्शिअस

उन्हाळ्यात काही सोपे उपाय वापरून स्वत:ला उष्माघातापासून वाचवा... 

  • थोड्या थोड्या वेळानं पाणी प्या.
  • कलिंगड, टरबूज, ताडगोळे अशी फळं खा. 
  • फळांचे ज्यूस, लिंबू सरबत, उसाचा रस, नारळ पाणी प्या. 
  • आहारात तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. 
  • काकडी खा, ताक प्या. सोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा.